अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तिघेजण अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

अल्पवयीन मुलीच्या बलात्कारप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी तिघाजणांना अटक केली.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तिघेजण अटक

वालचंदनगर - बेलवाडी (ता. इंदापूर) येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कारप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी तिघाजणांना अटक केली.

याप्रकरणी पोलिसांनी राहुल हनुमंत जाधव, तुकाराम लक्ष्मण गोरे (रा. दोघे, बेलवाडी) व आप्पा निवृत्ती गायकवाड (रा.सणसर) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शनिवार (ता. २०) रोजी दुपारी ११ ते ४ वाजण्याच्या सुमारास राहुल जाधव याने बेलवाडीमधील अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना घडली होती.

याप्रकरणी जाधव याला पोलिसांनी रविवार (ता. २१) रोजी अटक केले. आज सोमवारी (ता. २२) रोजी पोलिसांनी तुकाराम गोरे व आप्पा गायकवाड यांनी अटक केली असून या दोघांनी जाधव याला सहकार्य केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.इंदापूर न्यायालयाने राहुल जाधव याला २६ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. गोरे व गायकवाड यांनी मंगळवार (ता. २३) रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी लैंगिक अपराधपासुन बालकाचे संरक्षण अधिनियम (पोस्को) व अॅट्रॉसिटीनूसार गुन्हा दाखल केला असून, तपास बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे करीत आहेत.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन...

बेलवाडी मधील स्थानिक तसेच इंदापूर व बारामती मधील नागरिकांनी पिडीत मुलीचे नाव,आडनाव तसेच कुंटूबाची माहिती व फोटो सोशल मिडीया व इतरत्र प्रसारित करु नये. संबधित कुंटूबाची माहिती व्हायरल केल्यास संबधित व्यक्तिवर पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Three People Arrested For Raping A Minor Girl Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..