अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन जणांना सहा महिन्यासाठी तडीपार

गुन्ह्याची चाचपणी केल्यानंतर ते गंभीर गुन्हे घडवीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता.
crime
crime sakal

इंदापूर : इंदापूर पोलीस ठाण्याअंतर्गत (Indapur police station) अवैध वाळू वाहतूक करून दहशत निर्माण करणाऱ्या तीन जणांना इंदापूर, दौंड, कर्जत, जामखेड व करमाळा तालुक्यातून सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आले असून आणखी ५० ते ६० गुन्हेगारांची कुंडली तयार करण्यात आली आहे. त्यांच्यावर देखील लवकरच तडीपारी किंवा मोक्का अंतर्गत कारवाई होणार आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागियपोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्ग- दर्शनाखाली इंदापूर पोलीस ठाण्याचे नुतन सिंघम पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर , सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, श्री. माने व श्री. पाटील,पोलीस उपनिरीक्षक श्री. धोत्रे, दाजी देठे व श्री.लिंगाडे, पोलीस हवालदार श्री. भोईटे, पोलीस नाईक श्री. मोहिते, श्री. मोहळे, श्री. चौधर, श्री. चव्हाण, पोलीस शिपाई श्री. कोठावळे, श्री. अरणे, श्री. केसकर या पथकाने ही कार्यवाही केली.

crime
पुणे ते लडाख - श्वेताची यशस्वी बाईक सफर

यासंदर्भात पोलीस निरीक्षक मुजावर म्हणाले, उजनी धरण पाणलोट क्षेत्रात रात्री अपरात्री वाळूची तस्करी करणे, गावातील लोकांना एकत्रित करून मारामारी, दहशत निर्माण करणे, बेकायदा जमावजमविणे, तालुक्यातील इंदापूर शहर, कांदलगाव, हिंगणगाव तसेच इतर आसपासच्या गावातील साथीदारांना एकत्र करून टोळी प्रमुख योगेश नंदू जगताप (वय २८, हिंगणगाव ), टोळी सदस्य सौदागर बाळासाहेब ननवरे ( वय २९ ) व सुरक्षित वसंत राखुंडे ( वय ३१ दोघे रा.कांदलगाव ) यांनी गुन्हे केले होते.त्यांच्यावरील गुन्ह्याची चाचपणी केल्यानंतर ते गंभीर गुन्हे घडवीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता.

crime
गुलाब शेतीला पुन्हा सुगीचे दिवस

सदर प्रस्तावाची चौकशी करून उपरोक्त तीन जणांना पुणे जिल्ह्यातील इंदापूर,दौंड, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातून सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आले आहे. या कालावधीत ते दिसून आल्यास इंदापूर पोलीस ठाण्यात ( ०२१११२२३३३३ ) या क्रमांकावर संपर्क साधावा, त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था न ठेवणारे तसेच अवैध वाळू उपसा करणाऱ्या ५० ते ६०गुन्हेगारांची कुंडली तयार करण्यात आली असूनत्यांच्यावर देखील कारवाई होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com