
पुणे : कोरोनाच्या धास्तीने पालकांची चिंता वाढविली असून, खबरदारी म्हणून कात्रजमधील सरहद, धायरीतील डीएसके स्कूल, नांदेड सिटीतील पवार पब्लिक स्कूल या तीन शाळांना रविवार पर्यंत सुट्टी देण्यात आली आहे.
कोरोना भीती नको काळजी हवी!
पुण्यात कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्याने शाळांना सजग राहण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप म्हणाले, "शाळेला सुट्टी देण्याचा कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. तरीही राज्य बोर्डाच्या शाळांबाबत उद्या बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. या आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून शाळांना खबरदारी घेण्याचा सूचना दिल्या आहेत.
ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुणे - दुबईतून प्रवास करुन आलेल्या पुण्यातील पती-पत्नीला कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे निदान ‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था’ने (एनआयव्ही) केले. त्यांच्या पाठोपाठ त्यांची मुलगी, मुंबई ते पुणे दरम्यान त्यांनी प्रवास केलेल्या कॅबचा चालक आणि विमानातील सहप्रवासी, अशा तीन जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल ‘एनआयव्ही’ने मंगळवारी दिला. त्यामुळे पुण्यात कोरोना ‘पॉझिटिव्ह’ची संख्या पाच झाली आहे. या घटनेनंतर पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.