Nakusha Shinde : डबा चाळण विकणाऱ्याची मुलगी झाली कर व महसूल सहाय्यक

कुटुंबात शिक्षणाचा अभाव.. कमविणार्‍यापेक्षा खाणारी तोंडे जास्त.. तरीही वडिलांनी डबा चाळण विकून परिस्थितीला झेपेल एवढे मुलांना शिक्षण दिले.
Nakusha Shinde
Nakusha Shindesakal
Updated on

डोर्लेवाडी - कुटुंबात शिक्षणाचा अभाव.. कमविणार्‍यापेक्षा खाणारी तोंडे जास्त.. तरीही वडिलांनी डबा चाळण विकून परिस्थितीला झेपेल एवढे मुलांना शिक्षण दिले. मात्र कुटुंबातील नकोशीने अपार कष्ट व मेहनत घेऊन आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे चीज करून सर्वांना हवेसे केले.

डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील वैदु समाजातील नकुशा किसन शिंदे या पहिल्याच मुलीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन कर सहाय्यक व महसूल सहाय्यक पदाला गवसणी घातली आहे.तीच्या यशाबद्धल डोर्लेवाडी परिसरातून कौतुक होत आहे.

नकुशा शिंदे हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण डोर्लेवाडी येथे झाले. बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय येथे पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची परीक्षा द्यावा असा तिच्या मनात विचार आला होता. तसे घरी बोलूनही दाखविले होते.

परंतू घरची परिस्थिती हालाकीची असल्याने निर्णय बदलत असतानाच वडील किसन शिंदे व भाऊ सनी शिंदे यांनी कितीही कष्ट करावे लागले तरी शिक्षण पूर्ण करण्यासाठी व एमपीएससीची परीक्षा देण्यासाठी मदत करण्याची तयारी व पाठीशी ठाम राहण्याची भूमिका घेतल्याने नकुशा हिने मग पुणे येथील भगीरथ अॅकॅडमी येथे प्रवेश घेतला.

रोज १६ ते १८ तास अभ्यास करून त्यात सातत्य ठेवले.मात्र या काळात तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.आर्थिक परिस्थितीची जाणीव असल्याने मैत्रिणी सोबत अनेक दिवस एका वेळेच्या डब्यात दोघींनी जेवण केले. शिवाय अभ्यास करताना झोप लागू नये यासाठी केवळ एक पोळी खाऊनही दिवस घालविले.

दोन वर्ष परीक्षा दिल्यानंतर यश मिळाले नसल्याने वडिलांनी नकुशा हिचा विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जुलै २०२४ मध्ये गावातीलच प्रवीण भीमराव निंबाळकर याच्याशी तीचे लग्नही झाले. मात्र तरीही तीने जिद्द सोडली नाही. सासरच्या माणसांची परवानगी व आधाराने तीने पुन्हा पुण्यात जाऊन जोमाने अभ्यास केला व नुकत्याच झालेल्या परीक्षेत तीने यश देखील मिळविले.

आमच्या वैदू समाजात व कुटुंबात शिक्षणाचे प्रमाण फार कमी आहे. मला ३ बहिणी व २ भाऊ आहेत. मी बहिणींमध्ये लहान असल्याने माझ्यावर जास्त कोणाचे लक्ष नसायचे. माझे नावही नकुशा का ठेवले हे मला उशीरा कळाले. त्याच वेळी मी ठरविले होते काही तरी करून दाखवायचे. माहेरकडील कुटुंबाची व सासरच्या मंडळींचीही साथ मिळाल्याने यश मिळविता आले. अजून पुढे अभ्यास करून सेल टॅक्स इन्स्पेक्टर होण्याचे स्वप्न असल्याचे नकुशा हिने 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Irfan Sheikh Success Story From Farmer Family To Second Government Job After Repeated Failures In Competitive Exams
Gadchiroli Youth Ignatius Bada Overcomes Hardships Completes Education in Australia and Joins Lloyds Metals as Management Trainee
MBA Exam
Maharashtra Exam Reforms
Marathi News Esakal
www.esakal.com