

तिलारीच्या प्रवाहात दोघे गेले वाहून
ॲग्रोवन वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील तिलारी (ता. दोडामार्ग) नदीवरील घोटगेवाडी येथील लहान पूल ओलांडताना छत्तीसगड (सध्या रा. दोडामार्ग) दोघे जण पाण्यात वाहून गेले. अनुरंजन किसपोता (वय २५) व रेन दिलीप बडा (वय ७) अशी बुडालेल्यांची नावे आहेत.
दरम्यान, जिल्हात पावसाच्या सरी सुरूच असून, सोमवारी सायंकाळी अनेक भागांत जोरदार पाऊस झाला.
छत्तीसगड येथील हे दोघे परप्रांतीय कामगार घोटगेवाडी परिसरात केळी बागेत कामासाठी स्थायिक झाले आहेत. येथील स्थानिकांच्या केळी बागेत मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवतात. घोटगेवाडी येथे राहणारा अनुरंजन किसपोता हे दुसऱ्या कामगाराचा सात वर्षीय शाळकरी मुलगा रेन दिलीप बडा याला घेऊन वस्तीकडे परतत होते. घोटगेवाडी येथे तिलारी नदीपात्रातील पूल पाण्याखाली होते, असे असताना शाळकरी मुलाला हाताशी धरून अनुरंजन हे पूल पार करीत होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही प्रवाहाबरोबर वाहून गेले. वाहुन जाताना नदीच्या किनारी असलेल्या काही लोकांनी पाहीले. परंतु, पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने नदीत उतरणे कुणालाही शक्य झाले नाही. माहिती मिळाल्यानतंर स्थानिक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी काही भागात शोध घेतला. दरम्यान आज सकाळपासून एनडीआरएफची टीमने शोध मोहीम सुरू केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.