esakal | भंगार गोळा करणाऱ्यावर आली उपासमारीची वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

Scrab

भंगार गोळा करणाऱ्यावर आली उपासमारीची वेळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - घरोघर कचरा (Garbage) गोळा करून आणि त्यातील भंगार (Scrab) विकून महिन्याला आठ ते दहा हजार रुपये मिळतात. परंतु, लॉकडाउनमुळे (Lockdown) ऑफिसेस, दुकाने बंद असल्यामुळे व नागरिकांकडूनही भंगार मिळणे बंद झाले आहे, त्यामुळे महिन्याला जे काही पैसे (Money) मिळत होते, ते निम्म्याने कमी झाल्याचे सरूबाई सांगत होत्या.... (Time of famine came upon the scrap collector)

शहरात दिवसभर फिरून भंगार गोळा करणाऱ्या शंकरवर उपासमारीची वेळ आली आहे. भंगार सापडले तरी ते विकायचे कुठे? कारण, दुकाने बंद आहेत. पुठ्ठा, पत्रा, लोखंड, प्लास्टिकही आता फारसे मिळत नाही. घरात चौघेजण आहेत, कसे भागणार, असा सवाल त्यांनी केला. शहरातील कचरा वेचकांची परिस्थिती सांगणारी दोन उदाहरणे. परंतु, कोरोनामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

हेही वाचा: पुण्याचा गडी लढवतोय टोकियोची विधानसभा; नगरसेवक पदावरुन आमदारकीकडे झेप

काही स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. पुणेकरांनी मोलाची मदत देऊन कष्टकऱ्यांना हात दिला पाहिजे, असे आवाहन कागद, काच, पत्रा पंचायतीच्या संचालक लक्ष्मी नारायण यांनी केले आहे.

गरज आहे मदतीची

घरोघर कचरा गोळा करणाऱ्या सेवकांचा नागरिकांशी संपर्क येतो, त्यामुळे त्यांचे लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. कष्टकरी पंचायतीने १०० टक्के कचरा वेचकांचे लसीकरण करणे, बुडालेल्या रोजगाराचे पैसे त्यांना देणे, तसेच मास्क, सॅनिटायझर आदी सुरक्षा साधने पुरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नागरिकांनीही आर्थिक मदत करावी, असे आवाहन पंचायतीने केले आहे.

  • ८,००० सुमारे शहरातील कचरा वेचक

  • ३,५०० घरोघरी कचरा गोळा करणारे

  • १०,००० दरमहा सरासरी उत्पन्न

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा