

गोळी झाडून खूनप्रकरणी
दोघांना सोमवारपर्यंत कोठडी
तिप्पेहळ्ळीतील घटना; चालत्या कारवर झाडल्या होत्या गोळ्या
सांगोला, ता. २८ : तिप्पेहळ्ळी येथील कॅनॉलजवळ ३२ वर्षीय प्रतापसिंह ऊर्फ गब्बर करचे यांच्या डोक्यात पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयाने २ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. बालाजी ऊर्फ हर्षवर्धन नामदेव ऐवळे आणि विकी शिवाजी घेरडे (दोघे रा. किडेबिसरी, ता. सांगोला) अशी त्यांची नावे आहेत. खुनामागचे नेमके कारण आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी दिली.
मंगळवारी (ता. २७) मध्यरात्री सांगोला येथून किडेबिसरीकडे जात असताना तिप्पेहळ्ळी येथील कॅनॉलजवळ वाहनाचा वेग कमी झाला. याचवेळी प्रतापसिंह करचे यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूला पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताच्या पत्नी अर्चना करचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगोला पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. या कालावधीत खुनाचे कारण, गोळीबारात वापरलेले शस्त्र आणि संभाव्य अन्य साथीदारांबाबत चौकशी केली जाणार आहे. पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
जमिनीच्या व्यवहारावरून वाद?
तिप्पेहळ्ळी येथील पवनचक्कीसाठी खरेदी केलेल्या जमिनीच्या उर्वरित क्षेत्राच्या विक्रीच्या व्यवहारावरून मृत प्रतापसिंह करचे आणि काही व्यक्तींमध्ये वाद सुरू असल्याची माहिती त्यांच्या पत्नीने फिर्यादीत दिली आहे. या व्यवहारावरूनच खुनाची घटना घडली का, याचा तपास पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.