तिरकवाडीत नागपंचमीची दीडशे वर्षापूर्वीची परंपरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

तिरकवाडीत नागपंचमीची दीडशे वर्षापूर्वीची परंपरा

तिरकवाडी : नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. नागांच्या पूजेचा हा सण हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. नाग देवता शिवाचे अलंकार मानले जातात. याप्रमाणे फलटण तालुक्यातील तिरकवाडी गावांमध्ये दीडशे वर्षांपूर्वीची नागपंचमी सणाची परंपरा आहे गावातील पवार कुटुंबियातील सदस्य शेतातील काळी माती आणून नागदेवतेची चिखलाची मूर्ती तयार करतात कुटुंबातील सर्व सदस्य ही नागदेवता ची मूर्ती गावातील मारुती मंदिरा मध्ये ठेवतात गावातील सर्व नागरिक त्या ठिकाणी जाऊन पूजा करतात

त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष लहान मुले एकत्र येऊन पारंपरिक गाणी म्हणणे फुगडी खेळणे दोरी बांधून झोके खेळणी इत्यादी कार्यक्रम झाल्यावर संध्याकाळी गावातील सामूहिक विहिरीवर या नागदेवतेच विसर्जन केलं जातं पवार कुटुंबातील एक वृद्ध व्यक्ती वामन पवार वय 95 वर्षे आहे त्यांना विचारले असता ते सांगतात कैलास वासी विठोबा श्रीपती पवार यांनी ही परंपरा सुरु केली आहे आणि या कुटुंबातील पाचव्या पिढीमध्ये ही परंपरा अविरत चालू आहे.

Web Title: Tirakwadi F Nagpanchami 150 Years Old Tradition

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..