
तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे "ऑपरेशन सिंदूर"मधील विजयाच्या पार्श्वभूमीवर भारतात जवानांचे मनोधैर्य आणखी वाढविण्यासाठी "तिरंगा रॅली"चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप बाजारातील महात्मा जोतिराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विविध घोषणा देण्यात आल्या. तसेच येथील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकामध्ये "जय जवान, जय किसान, भारत माता की जय आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.