

छत्रपती संभाजीनगर, ता. १४ ः ‘भाजपकडून तिरंगा रॅली काढली जात आहे, काढलीही पाहिजे; परंतु, आजघडीला शाळांत पायाभूत सुविधा नसल्याने अवस्था बिकट झालेली आहे. त्यामुळे १५ ऑगस्टपासून ‘स्कूल ठीक करो’ हे अभियान राबविणार आहे. याची सुरवात हिंगोली जिल्ह्यातील आपल्या संतुक पिंपरी या मूळ गावापासून करणार आहोत’, असे कॉक्रोच जनता पक्षाचे (सीजेपी) संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके यांनी आज सांगितले. दिल्लीहून शहरात आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दीपके म्हणाले, ‘‘यात सरपंचांना शाळेतील समस्या सांगितल्या जातील. आजही बहुतांश गावातील शाळांत चांगले स्वच्छतागृहे नाहीत. बसण्यासाठी बेंच नाहीत. पाण्याची चांगली व्यवस्था व वीजही नाही. त्यामुळे सीजेपीचे सहकारी देशभरात आपआपल्या गावातील सरपंचांना आणि गावकऱ्यांना शाळा सुधारण्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती करतील. गावातील विद्यार्थ्यांना जोपर्यंत पूर्ण शैक्षणिक सुविधा मिळणार नाहीत, पूर्ण देश सुशिक्षित होत नाही तोपर्यंत महापुरुषांच्या स्वप्नातला देश निर्माण होणार नाही’’, असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.