

पुणे, ता. ११ : पाऊस पडून गेल्याने चिंब झालेले वातावरण... हातात डौलाने फडकणारा तिरंगा, ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’च्या घोषणा... बँड पथकाकडून वाजवली जाणारी देशभक्तीपर गीते... अन् पुष्पवृष्टी अशा उत्साहाच्या वातावरणात देशभक्तीचे स्फुरण चढलेली तिरंगा यात्रा पार पडली.
गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर ललित महल चौकापासून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली. सुरुवातीला प्रभात बँड पथक आणि त्यामागे हातात तिरंगा घेतलेले नागरिक, असा यात्रेचा क्रम होता. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेतेमंडळी तिरंगा यात्रेत सहभागी झाली. त्यांच्या मागे ‘भारत माता की जय’, वंदे मातरम्’ अशा घोषणा देत हजारो महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिकही यात्रेत सहभागी झाले.
रस्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या नागरिकांनी फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत यात्रेचे स्वागत केले. या वेळी ध्वनिवर्धकावरून घुमणारी देशभक्तिपर गीते उपस्थितांचा उत्साह वाढवत होती. या यात्रेत हातात तिरंगा घेऊन
स्केटिंग करणारे विद्यार्थी लक्षवेधी ठरले. त्याचप्रमाणे एनसीसी, एनएसएसचे छात्र तसेच माजी सैनिकही यात्रेत सहभागी झाले होते. काही युवकांनी स्वातंत्र्यसैनिकांची वेशभूषा केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.