

Pune Laser Light Ban
ESakal
विमानांचे सुरक्षित लँडिंग आणि टेकऑफ सुनिश्चित करण्यासाठी पुणे पोलिसांनी एक मोठे पाऊल उचलले आहे. लोहेगाव नागरी आणि लष्करी विमानतळ संकुलाच्या आसपास आकाशात हाय-बीम लाईट्स आणि लेसर लाईट्सचा वापर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी भारतीय नागरी संरक्षण संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत हा आदेश जारी केला आहे.