esakal | पुणेकरांनो, घराबाहेर पडताय? रेनकोट, छत्री सोबत असु द्या, कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

Rainy-Environment

कोकणासह पुणे, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये येत्या रविवारी (ता. ५) पावसाचा जोर वाढेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकणात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह रायगड, रत्नागिरी आणि तळकोकणात शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला. सांताक्रुझ येथे दिवसभरात १११ मिलीमीटर, मुंबईमध्ये ६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

पुणेकरांनो, घराबाहेर पडताय? रेनकोट, छत्री सोबत असु द्या, कारण...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - कोकणासह पुणे, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये येत्या रविवारी (ता. ५) पावसाचा जोर वाढेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकणात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह रायगड, रत्नागिरी आणि तळकोकणात शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला. सांताक्रुझ येथे दिवसभरात १११ मिलीमीटर, मुंबईमध्ये ६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उत्तर महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा आता दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीलगत आहे. त्यामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली असल्याचे हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले. 
दरम्यान सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. महाबळेश्वर येथे सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत ८२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सातारा, पुणे, नाशिक येथे पावसाच्या तुरळक सरी पडल्या.

आयटी पार्कमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय; आज कोणत्या भागात, किती रुग्ण आढळले पाहा

मुंबईसह, कोकणात दमदार हजेरी
कोकण किनारपट्टीलगतच्या समुद्रात ढगांची चांगलीच दाटी झाल्याने मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगड जिल्ह्यांसह घाटमाथ्यावर पावसाने दमदार हजेरी लावली. कोकणात अतिवृष्टी होत असल्याने नद्यांना पूर आले आहेत. नद्यांवरील पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला असून, शेतपिके पाण्याखाली गेली आहेत. शनिवारी दिवसभर अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम होता. 

शनिवारी (ता. ४) सकाळापर्यंतच्या २४ तासांमध्ये सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस झाला असून, मालवण येथे सर्वाधिक १९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नदी, नाले पुररेषा ओलांडण्याच्या स्थितीत आहेत. कुडाळ तालुक्यातील आबेंरी पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे तेथील २७ गावांचा सपंर्क तुटला आहे. 

loading image