आयटी पार्कमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय; आज कोणत्या भागात, किती रुग्ण आढळले पाहा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

आयटी सेक्टर असलेल्या हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे व बावधन परिसरात आता कोरोनाचा फैलाव वाढू लागला असून, शनिवारी (ता. ४) या भागात एकूण 6 कोरोनाबधित रुग्ण सापडल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी लकडे व गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी दिली. 

हिंजवडी - आयटी सेक्टर असलेल्या हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे व बावधन परिसरात आता कोरोनाचा फैलाव वाढू लागला असून, शनिवारी (ता. ४) या भागात एकूण 6 कोरोनाबधित रुग्ण सापडल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी लकडे व गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या सहा पैकी तीन रुग्णांना काहीच लक्षणे नसतानाही त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व चिंतेचे वातावरण आहे. सहा जणांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे, तर चार पुरुष आहेत.

Breaking : पिंपरी-चिंचवडकरांनो उद्या पाळा 'जनता कर्फ्यू'

हिंजवडीतील एका पिजीमध्ये राहणाऱ्या आयटीयन्सला कोरोनाची लागण झाली आहे. तर हिंजवडीत आणखी एका सोसायटीत राहणाऱ्या व्यक्तीलाही कोणतीही लक्षण नसताना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा अपघात झाला म्हणून त्याची टेस्ट केली असता, तो संक्रमित असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर एका गरोदर महिलेने प्रसूतीपूर्व टेस्ट केली असता, तिचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे.

गृहमंत्र्यांच्या सूचना ठरल्या नावापुरत्याच; ते पोलिस अद्यापही ऑन ड्युटीच

माण गावात देखील एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय मारुंजी व बावधन मधील एका एका पुरुषांना कोरोना झाला आहे. या सर्वांच्या सहवासात आलेल्या कुटुंबीयांना होम क्वारंटाइन केले असून, प्रशासनाने तो भाग सील केला आहे. 

दरम्यान, शनिवारी मुळशी तालुक्यात एकूण आठ रुग्ण मिळाल्याचे जठार यांनी सांगितले. त्यामुळे मुळशीतील रुग्णाची संख्या आता शंभरीच्या आसपास गेली आहे. किंबहुना नेरे गावातही काही रुग्ण मिळाले असून, रात्री उशिरापर्यंत त्यांची माहिती व अहवाल न मिळाल्याने रुग्णांचा नेमका आकडा समजू शकला नाही. त्यात काही रुग्ण थेट पुणे व पिंपरी चिंचवड येथील खाजगी रुग्णालयात दाखल होत असल्याने आकडेवारीत तफावत येत असल्याचे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six corona positive in Hinjewadi Maan Marunji Nere Bawadhan area