महापौरपदासाठी आज सोडत

PMC
PMC

पुणे - मुदत संपण्यास दहा दिवसांचा कालावधी राहिला असताना महापौरपदाच्या सोडतीसंदर्भात अखेर राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. पुण्यासह राज्यातील २७ महापालिकेतील या पदाची सोडत बुधवारी (ता. १३) दुपारी होणार आहे. 

महापौरपदाबरोबरच अन्य कारभारीही बदला, अशी मागणी भाजपातील नगरसेवकांनी लावून धरली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीमुळे सरकारने महापौरपदाच्या सोडतीला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. ती २२ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. सोडतीसंदर्भात सरकारने निर्णय घेतला नाही. त्यामुळे पदासाठी इच्छूक असलेले धास्तावले होते. दरम्यान, महापौरपदाची सोडत बुधवारी काढण्यासंदर्भातील निर्णय घेतला. त्याबाबतचे आदेश नगर विकास खात्याचे अवर सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी काढले. प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढली जाईल.

महापौरपदाची मुदत संपुष्टात आल्याने पक्षातील नव्या चेहऱ्याला संधी मिळणार आहे. या निमित्ताने सभागृह नेतेपदासह अन्य पदांमध्ये बदल करून नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, अशी मागणी सुरू झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com