कोटेश्र्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी

कोटेश्र्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी

चास, ता. २ : भोरगिरी (ता. खेड) येथील श्री कोटेश्र्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भाविकांच्या मांदियाळीमुळे मंदिर व परिसर फुलून गेला होता. आदिवासी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत कोटेश्र्वराच्या दर्शनासह विविध वस्तुंची खरेदीचा आनंद लुटला.
कोटेश्र्वराचे दर्शन घेतल्यावर भीमाशंकर मंदिराच्या दर्शनासाठी गेल्यावरच दर्शन परिक्रमा पूर्ण होते. त्यामुळे या मंदिराला भावनिक आधार आहे. आदिवासी पट्यात असलेल्या या मंदिराचे मुख्य पुजारी व भक्तगण हे आदिवासी असून दर्शनासाठी सगळ्यात जास्त गर्दी आदिवासी नागरिकांची असते. दोन वर्षांपासून कोरोनामुळे मंदिर बंद राहिल्याने भाविकांना माहाशिवरात्रीला दर्शन घेता आले नव्हते.
बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल वनघरे, संजय काठे, महिपत सुपे, ज्ञानेश्र्वर सुपे, शंकर लांघी, सुरेश काठे, वसंत धादवड, नामदेव काठे, सुरेश काठे, दिलीप सोनवणे, चंद्रकांत काठे, दत्तात्रेय तळपे, दत्ता काठे, शंकर सुपे यांसह अन्य नागरिकांनी भाविकांना दर्शन सुलभ होण्याबरोबरच प्रसाद वाटप व सुरक्षेसाठी योगदान दिले.

दर्शनाबरोबरच खरेदीसाठी उत्साह
चालू वर्षी निर्बंधही शिथिल झाल्याने भाविकांना महाशिवरात्रीनिमित्त कोटेश्र्वर मंदिरात दर्शनाचा लाभ घेता आला. या शिवाय व्यापारी वर्गाने यामध्ये बेलफुल, प्रसाद, खेळणी, हॅाटेल, सौंदर्य प्रसाधने, भाजीपाला यांचबरोबर पाळणे, जंपिंग यांची दुकाने सजल्याने भाविकांना दर्शनाबरोबरच खरेदीसाठी उत्साह दाखवला. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मंदिरासमोर मोठ्या रांगा लावल्या होत्या, सुमारे पंचवीस हजार नागरिकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
-------------
00007

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com