थोरांदळे येथील शिष्यवृत्ती परीक्षेत सहा विद्यार्थी जिल्हा यादीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थोरांदळे येथील शिष्यवृत्ती परीक्षेत सहा विद्यार्थी जिल्हा यादीत
थोरांदळे येथील शिष्यवृत्ती परीक्षेत सहा विद्यार्थी जिल्हा यादीत

थोरांदळे येथील शिष्यवृत्ती परीक्षेत सहा विद्यार्थी जिल्हा यादीत

sakal_logo
By

निरगुडसर ता. १० : थोरांदळे (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेतली इयत्ता आठवीतील सहा विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा यादीत पात्र ठरले असल्याची माहिती मुख्याध्यापक दिलीप केंगले यांनी दिली.
प्रियांका संजय विश्वासराव, सिद्धी विष्णू घुले, सोनाली रमेश टेमगिरे, श्रावणी सचिन टेमगिरे, शुभम मंगेश फुटाणे, सिद्धेश बाळू विश्वासराव हे सहा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले. सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक संतोष गवारी यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे, विस्तार अधिकारी संचिता अभंग, केंद्रप्रमुख मनोहर सांगळे, गजानन पुरी, मुख्याध्यापक दिलीप केंगले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश टेमगिरे सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व व्यवस्थापन समिती सदस्य यांनी अभिनंदन केले .
जिल्हा परिषदेची इयत्ता आठवीपर्यंत वर्ग असलेली थोरांदेळे ही एकमेव शाळा असून महाराष्ट्र राज्य मॉडेल स्कूल म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता आठवीतील सहा विद्यार्थी येणे ही अभिमानाची बाब असल्याचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश दगडू टेमगिरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top