मुळा-मुठा नदी पात्रालगत बेसुमार वृक्षतोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुळा-मुठा नदी पात्रालगत बेसुमार वृक्षतोड
मुळा-मुठा नदी पात्रालगत बेसुमार वृक्षतोड

मुळा-मुठा नदी पात्रालगत बेसुमार वृक्षतोड

sakal_logo
By

यवत, ता. १५ ः दौंड तालुक्याच्या पश्चिम भागातील मुळा मुठा नदी तटावर असलेल्या जंगलातून बेसुमार वृक्षतोड होत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबतची माहिती देऊनही वनविभागाकडून दुर्लक्ष होत असल्याची स्थानिक नागरिक तक्रार करत आहेत.
दौंड तालुक्याच्या पश्चिम भागातील उंडवडी, राहू, पिंपळगाव, खामगाव, दहिटणे, नांदूर या गावांच्या हद्दीतील नदी पात्रालगत असलेल्या जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे.
नदी तटाचे रक्षण करणारी ही जंगले थोड्याच दिवसात नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पुराच्या काळात नदी पात्रालगतच्या शेत शिवाराची धूप या जंगलांमुळे थांबत असते. या जंगलात बाभूळ, कडुनिंब या झाडांचे प्रमाण अधिक आहे. जळाऊ लाकडासाठी प्रामुख्याने ही वृक्षतोड होत आहे. हातभट्टी, हॉटेल, ढाबे, स्मशानभूमी अशा ठिकाणी या लाकडाला मोठी मागणी असल्याने संबंधितांसाठी हा गोरस व्यवसाय बनला आहे.
दिवसभर फिरून झाडांच्या खोडांना गोलाकार काप घ्यायचे त्यामुळे वाळलेली झाडे रात्रीच्या वेळी तोडायची अशी पद्धत येथे वापरली जात आहे. काही स्थानिक नागरिकांच्या हे निदर्शनास आल्यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचारी- अधिकाऱ्यांचे या व्यवसायाशी अर्थपूर्ण संबंधतर नाहीत ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.

...तर कारवाई करणार
यवतला नदी पट्यात कुबाभूळ व इतर वृक्षांचे घनदाट जंगल आहे. त्याची जपणूक होणे पर्यावरणाच्या दृष्टीने गरजेचे आहे. येथे वृक्षतोड करताना कोणी निदर्शनास आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. मात्र, त्याचबरोबर स्थानिक नागरिकांनी याबाबत लेखी तक्रार दिल्यास कारवाई करणे सोपे होईल, असे वनपाल जी. एम. पवार यांनी सांगितले.

00111

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top