पोंदेवाडी येथे आगीमुळे गॅरेजचे नुकसान
पारगाव, ता.२० : पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील मोटारसायकल गॅरेजला शनिवारी (ता. १९) रात्री आग लागून तीन मोटारसायकल, विक्रीसाठी आणलेले स्पेअरपार्ट जळून सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.
पारगाव- शिरूर रस्त्यालगत रोडेवाडीफाटा येथे रोहन सीताराम नरवडे (रा. सविंदणे, ता. शिरूर) यांचे गॅरेज आहे. सायंकाळी सात वाजता ते गॅरेज बंद करून सविंदणे येथे गेले. साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांना शेजारील चायनीज सेंटरवाल्याचा फोन आला. त्याने गॅरेजला आग लागल्याचे सांगितले. ते पोहचेपर्यंत गॅरेजला आगीने पूर्णपणे वेढले होते. खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, बाळासाहेब पडवळ, सतीश घोलप, सुरेश घोलप, विशाल टाकळकर, गणेश दौंड, किरण साकोरे, बाबू घोलप, विशाल रोडे, सचिन हारके यांनी आग नियंत्रित करण्यात प्रयत्न केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.