कमलजादेवी मंदिरातील चांदीच्या पादुकांची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कमलजादेवी मंदिरातील चांदीच्या पादुकांची चोरी
कमलजादेवी मंदिरातील चांदीच्या पादुकांची चोरी

कमलजादेवी मंदिरातील चांदीच्या पादुकांची चोरी

sakal_logo
By

महाळुंगे पडवळ, ता. १४ : कळंब (ता. आंबेगाव) येथील आदिशक्ती कमलजादेवी माता मंदिराच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चांदीच्या पादुका चोरून नेल्या आहेत. गुरुवारी (ता. १३) पहाटेच्या सुमारास चोरीची घटना सुरू असताना सायरन वाजल्याने चोरटे घाबरून पळून गेले.
मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार राजेंद्र हिले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव भालेराव, भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक यशवंत कानडे, उद्योजक नितीन भालेराव, युवराज भालेराव, पुजारी शिवाजी उबाळे, नाथा गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीश होडगर यांनी मंदिरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व मंदिर परिसरात सौर दिवे बसविण्याबाबत गावकऱ्यांना सूचना केली आहे, असे हिले यांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top