''मोरगाव पाणीपुरवठा''च्या खासगीकरणासाठी टेंडर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''मोरगाव पाणीपुरवठा''च्या खासगीकरणासाठी टेंडर
''मोरगाव पाणीपुरवठा''च्या खासगीकरणासाठी टेंडर

''मोरगाव पाणीपुरवठा''च्या खासगीकरणासाठी टेंडर

sakal_logo
By

मोरगाव, ता.८ : बारामतीच्या पश्चिम भागासाठी वरदान ठरलेली मोरगाव पाणीपुरवठा योजना थकबाकीमुळे अडचणी आली आहे. ती सुरळीत चालविण्यासाठी खासगी
तत्त्वावर देण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून टेंडर काढण्यात आले आहे.

बावीस गावांसाठी असलेल्या या योजनेतून सध्या पंधरा गावांना पाणीपुरवठा होतो. ही योजना पाणी वापरत असलेल्या ग्रामपंचायतींनी चालविण्यास घ्यावी, असा जिल्हा परिषदेचा प्रस्ताव होता. यासाठी बारामती पंचायत समितीमध्ये संबंधित विभागाचे अधिकारी आणि योजनेचे पाणी घेत असलेल्या गावांचे सरपंच व ग्रामसेवक यांची एकत्रित बैठक झाली मात्र, ही योजना चालविण्यासाठी ग्रामपंचायतींनी असमर्थतता दाखविली.
योजनेची कोट्यवधी रुपयांची असलेली थकबाकी, पाणीपट्टी भरण्यासाठी ग्रामपंचायतीचा कमी प्रतिसाद, योजना चालविताना त्यावर येणारा खर्च यामुळे ही योजना जिल्हा परिषद चालविण्यास सकारात्मक नाही. मात्र, ही योजना बंद झाल्यास किमान पंधरा गावांवर पाणीटंचाईचे मोठे संकट येणार आहे. शिवाय टँकरने पाणीपुरवठा करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय पंधरा गावांसाठी उपलब्ध नाही. नुकताच जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या बैठकीतही सरपंच व ग्रामसेवक यांनी योजना ही सध्या तरी जिल्हा परिषदेकडेच ठेवावी एकही ग्रामपंचायत योजना चालविण्यासाठी सक्षम नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे जिल्हा परिषदेने अधिकृत टेंडर काढून ही योजना खासगी तत्त्वावर चालवायला देण्याचे नियोजन केले आहे. योजना चालविणाऱ्या यंत्रणेस अधिकार देणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली.

योजना चालविण्यासाठी असे आहे नियोजन
१. पाच तारखेपर्यंत पाणी वापरणाऱ्या ग्रामपंचायतींना बिले देणे
२. सहा ते दहा तारखेपर्यंत संबंधित ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी भरणे
३. पाणीपट्टी न भरल्यास अकरा तारखेला पूर्वसूचना न पाणीपुरवठा स्थगित करणे


मोरगाव योजना जिरायती भागातील गावांना बारमाही पाणी पुरविण्यासाठी संजीवनी आहे. त्यामुळे पाणी वापरत असलेल्या ग्रामपंचायतींनी वसुलीही नियमित करून वापरलेल्या पाण्याची पाणीपट्टी नियमित भरावी.
-विश्वास देवकाते, सदस्य, जिल्हा परिषद

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top