कुरुळीत महामार्गावरील साइड पट्ट्या भरल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुरुळीत महामार्गावरील साइड पट्ट्या भरल्या
कुरुळीत महामार्गावरील साइड पट्ट्या भरल्या

कुरुळीत महामार्गावरील साइड पट्ट्या भरल्या

sakal_logo
By

कुरुळी, ता.२ : येथील पुणे - नाशिक महामार्गावरील कुरुळी गावच्या फाट्यावरील साइड पट्ट्या अखेर ''सकाळ''च्या बातमीच्या दणक्यानंतर प्रशासनाकडून भरण्यात आल्या आहेत.
कुरुळी परिसरातील ग्रामस्थांनी अनेक वेळा साइड पट्ट्यांबाबत मागणी केली होती. महामार्गाच्या बाजूपट्ट्या, दिशादर्शक फलक, झेब्रा क्रॉसिंग, लाईटकटर, स्वतंत्र सिग्नल यंत्रणा या कामांकडे सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी दुर्लक्ष करीत होते. मात्र आता या रस्त्याच्या कडेच्या साइडपट्ट्या भरल्या आहेत.

चिंबळी फाटा येथे दुतर्फा बाजूपट्ट्यांवर जीवघेणे खड्डे अनेक दिवसांपासून पडले होते. झेब्रा क्रॉसिंग, रस्ता दुभाजक लाइट कटर कुरुळी, मोई, चिंबळी फाटा सिग्नल बसविण्याची मागणी केली होती. या मागणीचा बांधकाम विभागाने दखल घेत साइडपट्ट्या भरल्या आहेत.
गेल्या वर्षभरामध्ये या रस्त्यावर अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. काही जणांना गंभीर दुखापत व कायमचे अपंगत्व आले असल्याने राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी प्रवासी, नागरिकांकडून होत होती. मात्र त्याची दखल आता घेण्यात आली आहे. साइडपट्ट्या भरल्या बद्दल नागरिकांनी सकाळचे आभार मानले आहेत.

पुणे-नाशिक महामार्गावर बर्गेवस्ती येथे रस्ता दुभाजक, वाहतूक नियंत्रण दिवे सिंगल, झेब्रा कोसिंग केल्यास वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. या बाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व चाकण वाहतूक पोलिसांनी रस्ता दुभाजक करण्याची मागणी केली आहे.
- शरद मुऱ्हे, माजी सरपंच/विद्यमान सदस्य ग्रामपंचायत, कुरुळी
....................
चिंबळीफाटा (ता.खेड) : पुणे-नाशिक महामार्गावर भरलेल्या साइट पट्टया भरल्या. k

00999