
पसायदान स्पोर्ट्स क्लबची बाजी
कुरुळी, ता.३० : निघोजे (ता. खेड) येथे शहीद राजगुरू, भगतसिंग व सुखदेव यांच्या ९१ व्या शहीद दिनानिमित्त टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. चुरशीच्या लढतीत आळंदी देवाची येथील पसायदान स्पोर्ट्स क्लबने प्रथम क्रमांक पटकविला. वाल्मीकी वॉरिअर्स, नायडूनगर या संघाने द्वितीय क्रमांक तर चिखलगावच्या दिशा स्पोर्ट्स फाउंडेशनला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
सलग पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत ३२ संघांनी सहभाग घेतला. प्रथम क्रमांकास १ लाख ५१ हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकास १ लाख रुपये व चषक तर तृतीय क्रमांक ७५ हजार रुपये व चषक देण्यात आला. शेलपिंपळगाव येथील श्री हनुमान स्पोर्ट्स क्लबने चतुर्थ क्रमांक मिळविल्याने त्यास ५१ हजार रुपये व चषक असे बक्षीस देण्यात आले. सर्व विजेत्या संघांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प तसेच खेळाडूंना शहीद राजगुरू, भगतसिंग व सुखदेव यांच्या प्रतिमा व क्रांतिवीर राजगुरू ट्रस्टचे प्रमाणपत्र संतोष शिंदे यांच्या सौजन्याने देण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज म्हणून लक्ष्मण पोळेकर आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सलमान शेख यांची निवड झाली. मॅन ऑफ द सिरीज हा किताब गणेश धुंडरे या खेळाडूने पटकाविला. दरम्यान, पसायदान स्पोर्ट्स क्लबचे मालक अनिल वाळके हे क्रांतिवीर राजगुरू ट्रस्टचे विश्वस्त आहेत.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेचे उद्घाटन पोलिस निरीक्षक अरविंद पवार, उद्योजक नितीन गोरे, क्रांतिवीर राजगुरू ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल पाचारणे यांच्या हस्ते करण्यात आले.
बक्षीस वितरण क्रांतिवीर राजगुरू ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष शिंदे, उपाध्यक्ष भानुदास येळवंडे, सचिव नितीन गायकवाड, कोषाध्यक्ष शिवाजी सोनवणे, कार्यकारी विश्वस्त कैलास येळवंडे, गोविंद जाधव, अशोक कोरडे, विकास नाणेकर, कुलदीप येळवंडे, चंद्रकांत बेंडाले, एकनाथ करपे, प्रसाद करपे, नवनाथ येळवंडे, संदीप येळवंडे, उद्योजक रामदास धनवटे, सुनील देवकर, सागर येळवंडे, अमित पानसरे, कालिदास येळवंडे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
01035