जेजुरीला विकासाकडे नेणाणारे नेतृत्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेजुरीला विकासाकडे नेणाणारे नेतृत्व
नीरा भीमा कारखान्याचे उच्चांकी गाळप-BAW21B0053

जेजुरीला विकासाकडे नेणाणारे नेतृत्व

sakal_logo
By

पुरंदर-हवेलीचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार संजयजी जगताप म्हणजे एक कुशल नेतृत्व गुण असलेले व्यक्तिमत्त्व. पुरंदरच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडूनच झाला आहे. जेजुरी शहरासाठी अनेक प्रकारचे निधी मिळवून देऊन व योग्य ते मार्गदर्शन करून जेजुरी स्वच्छ, सुंदर व सुविधायुक्त करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. दिवंगत चंदुकाका जगताप यांचा समाजकारणाचा वारसा उत्तम पद्धतीने ते घेऊन चालले आहेत. जनसामान्यांसाठी नेहमीच तत्परतेने उपलब्ध असलेले नेते अशी त्यांची
ओळख आहे. अनेक संस्थांवर काम करताना त्या सर्व संस्था उत्तमरीतीने ते चालवितात. सहकारातही त्यांचे काम उठावदार आहे.

-वीणा सोनवणे, नगराध्यक्षा, जेजुरी

कोरोना काळात नागरिकांना दिलासा
कोरोनाच्या काळात पुरंदरच्या जनतेसाठी जे कार्य संजयसरांनी व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने केले ते शब्दात सांगताच येणार नाही. सहा महिने तालुक्यांतील प्रत्येक घरात दूध पोचवले. कोरोना रुग्णांसाठी मंगल कार्यालय, स्वतःच्या शाळेत हॅास्पिटल तयार केले. कोरोना केंद्रावर सर्व प्रकारच्या सोयी सुविधा पुरविल्या. कोरोनासारख्या एवढ्या मोठया संकटाचा त्यांनी धैर्याने सामना केला. कोरोना केंद्रावर भोजनासह अनेक सुविधाही त्यांनी उपलब्ध करून देत नागरिकांना दिलासा दिला.

जेजुरीच्या सर्वांगीण विकासाला मदत
जेजुरीकरांनी आमदारसाहेबांवर विश्वास ठेवून अनेक वर्षांची सत्ता बदल करून आम्हा नवख्यांना संधी दिली. माझ्यासारख्या महिलेला नगराध्यक्षपदी निवडून दिले. सरांमुळे कॉंग्रेस पक्षाला एकहाती सत्ता जेजुरीत मिळाली. सासवडप्रमाणे जेजुरीचा विकास करण्यासाठी सरांनी अनेक योजनांवर आम्हाला मार्गदर्शन केले. संजयसरांचे जेजुरीबद्दल असलेले प्रेम हे सध्या जेजुरी शहरात झालेल्या विकासकामांतून दिसत आहे. अनेक योजनांतून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे निधी जेजुरी पालिकेसाठी मिळवून दिला. त्यामुळे
जेजुरीच्या सर्वांगिण विकासाला मदत झाली आहे. शहरातील रस्ते चकाचक झाले आहेत.

जेजुरीतील बहुजन समाजाला पालिकेच्या इतिहासात प्रथमच नेतृत्व करण्याची संधी त्यांनीच मिळवून दिली. दिलेल्या शब्दांवर ठाम
असलेले नेते मी संजय सरांच्या माध्यमातून प्रथमच अनुभवले आहेत. साधी राहणी, सर्वांचे ऐकून घेण्याची व योग्य ते मार्गदर्शन करण्याची त्यांची पध्दत आम्हा कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरते. शेवटी एकच सांगेन की संजयसरांनी जेजुरीकरांसाठी शहराच्या मूलभूत गरजा आमच्या माध्यमातून मागील ५ वर्षात पूर्ण केल्या आहेत. जर जेजुरी शहराचे भवितव्य उज्ज्वल बनवायचे असेल तर जेजुरीकरांनी नगरपालिकेत आमदार संजयजी जगताप यांच्याच विचाराचे लोकप्रतिनिधी निवडून नगरपालिकेत पाठवावेत.
जेणेकरून खऱ्या अर्थाने जेजुरी ही सोन्याची जेजुरी म्हणून दिसेल. जनसामान्यात रमणाऱ्या या असामान्य नेत्याला जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा...!

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top