
बेल्हे येथील तरुणाची आत्महत्या
आळेफाटा, ता. ३१ : बेल्हे-तांबेवाडी (ता. जुन्नर) येथे एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन केली आत्महत्या
याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्याकडून माहिती मिळाली की, बेल्हे-तांबेवाडी येथील सागर लक्ष्मण काचळे (वय २७) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. ३०) मध्यरात्री घडली. तो रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर त्याच्या खोलीत झोपण्यासाठी गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची आई त्याला उठविण्यासाठी गेली असता त्याने घराच्या छताला असलेल्या लोखंडी पाईपला नायलॉन पट्ट्याच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. याबाबतची फिर्याद आदिनाथ लक्ष्मण काचळे यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यामध्ये दिली. आळेफाटा पोलिसांनी आकस्मिक मृत्यू, अशी नोंद केली आहे. याबाबतचा पुढील तपास आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अमित पोळ हे करत आहेत.
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..