
जेजुरीतील पवार महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शन
जेजुरी, ता.२ : ''''जागतिक बाजारपेठांची एक भाषा अस्तित्वात येते आहे. त्यामुळे त्या बाजारपेठांना शरण गेल्या आहेत. त्यामुळे तरुणांची भाषा, शब्दसंग्रह बदलताना दिसतो. या पार्श्वभूमीवर मराठीने आपले मराठमोळेपण टिकवून ठेवायला हवे. आपण भाषेशी, मातीशी, संस्कृतीशी प्रामाणिक राहिलो तर आजच्या भाषेपुढील आव्हाने सहज पेलू शकू,'''' असे प्रतिपादन फर्गुसन महाविद्यालयातील मराठी विषयाच्या प्रा. डॉ. रुपाली शिंदे यांनी केले.
जेजुरी (ता. पुरंदर) येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिवसानिमित्त हनुमंतराव चाचर ग्रंथालयाच्या वतीने मराठी पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.धनाजी नागणे, मराठी विभाग प्रमुख डॉ.अरुण कोळेकर, प्रा.कल्पना रोकडे उपस्थित होते. डॉ.शिंदे पुढे म्हणाल्या की,आजची आपली मातृभाषा तंत्रज्ञानाच्या उंबरठ्यावर संकोचून उभी आहे .आपण आपल्या मातृभाषेतून लेखन, वाचन, संवाद केला पाहिजे. आपल्या संतांनी योजलेली मानवतावादाची, विश्वकल्याणाची देशी भाषा आजच्या तरुण पिढीने अभ्यासायला, शिकायला हवी असे आवाहन केले.
दरम्यान, चैत्राली कुदळे यांनी कवितांच्या भित्तीपत्रकाचे लेखन केले. प्रा.राजेंद कोल्हे, सुरेश खरात, सुरेखा जगताप, श्याम पवार, सीताराम भोकटे यांनी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन केले होते.
प्रा.डॉ. अरुण कोळेकर यांनी प्रास्ताविक तर प्राचार्य डॉ.धनाजी नागणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.कल्पना रोकडे यांनी आभार मानले.
01244