
घाडगेवाडी सोसायटीची निवडणूक बिनविरोध
माळेगाव, ता. २४ ः घाडगेवाडी (ता. बारामती) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. बारामती खरेदी विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष शरदचंद्र शंकरराव तुपे व बारामती तालुका दूध संघाचे माजी संचालक रवींद्र नारायण घाडगे यांनी यासाठी पुढाकार घेतला. तानाजीराव घाडगे, राजकुमार शेडगे, पुंडलिक शिंदे, हरिश्चंद्र शिंदे, सोपानराव काकडे, मनोहर तुपे, अंकुश पवार, जगन्नाथ चव्हाण, संजय घाडगे, पोपट भगत, आबासाहेब चव्हाण, जयवंत कोकरे आदींनी निवडणूक बिनविरोध करण्यास पाठिंबा दिला. त्यानुसार संस्थेचे सचिव महादेव भगत व सहसचिव संदीप बारवकर यांनी नियमानुसार पुढील प्रक्रिया केली. नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढील प्रमाणे ः शरदचंद्र शंकरराव तुपे, सतीश नारायण चव्हाण, रवींद्र सुखदेव साबळे, अनिल बबनराव घाडगे, सुदाम संभाजी भांडवलकर, सुभाष मानसिंग शिंदे, चंद्रकांत विठ्ठल तुपे, सूर्यकांत संभाजी काकडे, अरुण एकनाथ देवकाते, कुसुम मधुकर फडतरे, पुष्पा पोपट चव्हाण, सुमन विष्णू काटकर.
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..