महाराणी सईबाईंच्या समाधीस्थळाचा होणार विकास

महाराणी सईबाईंच्या समाधीस्थळाचा होणार विकास

वेल्हे, ता.८ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धर्मपत्नी व संभाजी महाराज यांच्या मातोश्री महाराणी सईबाई यांची राजगडाच्या पायथ्याशी पाल बुद्रुक (ता. वेल्हे) येथे समाधी आहे. समाधीस्थळ व शिवपट्टण परिसराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आमदार संग्राम थोपटे व विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शनिवारी (ता.८) समाधीस्थळ, शिवपट्टण, खंडोबाचा माळ या परिसराची पाहणी केली.

समाधीस्थळाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सूचना केल्या होत्या. समाधीस्थळ व किल्याच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाड्यास तसेच परिसरास शिवपट्टण म्हणतात. गेली अनेक वर्षांपासून या समाधीस्थळ परिसराची दुरवस्था झाली होती तर या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग राहिला नव्हता. येथील शिवकालीन जागेवर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी होती. मात्र, आता विकास आराखड्यामुळे परिसराच्या शिवकालीन इतिहासाला उजाळा मिळणार असून, लाखो पर्यटक याठिकाणी भेट देतील.
दरम्यान, सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी समाधीस्थळ व परिसराच्या विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांसह जलसंपदा, भूमी अभिलेख, पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसराला भेट देऊन पाहणी करुन अहवाल सादर करण्याचेही निर्देश दिले होते.


विकास दोन टप्प्यात होणार
समाधीस्थळाचा विकास करण्यासाठी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच विधानभवनात बैठक आयोजित केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार संग्राम थोपटे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्यासह महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्रीमंत छत्रपती महाराणी सईबाई महाराज स्मारक समिती ट्रस्टच्या वतीने तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विकास आराखड्यासाठी निधी दिला जाणार असून, हा विकास दोन टप्प्यात होणार असल्याचे सांगितले.

पाहणी करताना वेल्हेचे सभापती दिनकर सरपाले, पुरातत्व विभागाचे विलास वाहने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, भोरचे महसूल उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, अभियंता अजय भोसले, कार्यकरी अभियंता नीरा देवघर राजेंद्र डुबल, वनविभागाच्या अधिकारी आशा भोंग,तहसीलदार शिवाजी शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव धरपाळे,अमोल नलावडे, वेल्हेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार, नाना धुमाळ, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रदीप मरळ, माजी तालुकाध्यक्ष शंकरराव भुरुक, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवराज शेंडकर, उपाध्यक्ष गणेश जागडे, गोरख शिर्के, विशाल वालगुडे शिवाजी चोरगे, भगवान शिंदे, आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

00987

00986

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com