आईनेच घेतला पोटच्या दोन चिमुरड्यांचा जीव | Childrens Murder | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder
आईनेच घेतला पोटच्या दोन चिमुरड्यांचा जीव

आईनेच घेतला पोटच्या दोन चिमुरड्यांचा जीव

पौड - शिरवली (ता. मुळशी) येथे मातेनेच (Mother) पोटच्या दोन चिमुरड्यांचा गळा आवळून खून (Murder) केला. मातृत्वाच्या नात्याला कलंक लावणाऱ्या या ह्रदय द्रावक घटनेतील पौड पोलिसांनी मातेला अटक (Arrested) केली आहे.

पूना संजय सोलंकी (वय २४ वर्ष, सध्या रा. कॅप्रीकाँन होम अँन्ड डेव्हलपर्स लेबरकँम्प, शिरवली, ता. मुळशी) (मूळ रा. मेरीखेडा, ता. हरसोद, जि. खांडवा, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून मुलगी चंदा (३ वर्षे ६ महिने) आणि मुलगा आनंद (वय २) अशी बळी गेलेल्या निष्पाप बालकांची नावे आहेत.

हेही वाचा: पुणे : विद्यापीठात ‘अश्वगंधा’ संशोधन प्रकल्प

याबाबत पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय जगन्नाथ सोलंकी (वय २५) हे पत्नी पूना, मुले चंदा, आनंद यांच्यासमवेत मध्यप्रदेशातून उपजीविकेसाठी मुळशी तालुक्यात आले होते. बुधवारी (५ जानेवारी) दुपारी एकच्या सुमारास पूना दोन्ही मुलांना घेऊन घरातून निघून गेल्या. वस्तीतील काही मुलांनी तिघांना जाताना पाहिले. पूनाने मुलांना जंगलात नेले. तिथे रस्सीने दोघांचा गळा आवळून त्यांचा खून केला. त्यांचे मृतदेह जंगलात टाकून दिले व तिथून निघून गेली. संध्याकाळी कामावरून घरी आल्यानंतर संजयने पत्नी, मुले घरी नसल्याचे पाहिले. तेव्हा त्यांनी शोधाशोध सुरू केली असता घराभोवती खेळणाऱ्या मुलांनी तिघेही ज्या वाटेने गेले तो रस्ता दाखविला. संजयने मित्राच्या मदतीने जंगलाच्या दिशेने जाऊन शोध घेतला. त्यावेळी दोन्ही मुलांचे मृतदेह त्यांना आढळून आले. त्यानंतर पौड पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार केली. पोलिसांनी जंगल परिसरात शोध घेऊन पूनाला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव करीत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punecrimemurderchildren
loading image
go to top