चांदेरेंच्या घड्याळाचा उपाध्यक्षपदी गजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांदेरेंच्या घड्याळाचा उपाध्यक्षपदी गजर
चांदेरेंच्या घड्याळाचा उपाध्यक्षपदी गजर

चांदेरेंच्या घड्याळाचा उपाध्यक्षपदी गजर

sakal_logo
By

पौड, ता. १५ : वयाच्या २७ व्या वर्षापासून राष्ट्रवादीत काम करणाऱ्या सुनील चांदेरे यांची जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. ही संधी म्हणजे त्यांच्या पक्षनिष्ठेचेच फळ आहे. एम. कॉम झालेल्या या युवकाचा सूस (ता. मुळशी) गावचे उपसरपंच ते बॅंकेचे उपाध्यक्ष हा प्रवास केवळ राष्ट्रवादीच्या घड्याळाचाच गजर करणारा ठरला आहे.
वारकरी सांप्रदायाचा वारसा जपलेल्या रूसाबाई आणि काशिनाथ या मातापित्यांपोटी जन्मलेल्या सुनील यांना महाविद्यालयीन जीवनापासूनच संघटनेत काम करण्याचे धडे मिळाले. त्यांनी युवा अस्मिता संघटनेची स्थापना करीत युवकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. आपल्या तडफदार वक्तृत्वशैलीने त्यांनी अनेक सभा गाजवल्या. शरद पवार यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा पगडा होता. दिवंगत तुकाराम हगवणे यांच्या तालमीत त्यांच्यावर राजकीय संस्कार झाले. त्यामुळेच १९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर त्यांनी पक्षात सक्रियपणे काम करण्यास सुरूवात केली. आपल्या सूसगावापासून राष्ट्रवादीच्या बळकटीचा त्यांनी प्रारंभ केला. २००२मध्ये ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणली. २००२ ते २००७ या काळात ते गावचे उपसरपंच होते.
२०१५ ला त्यांना श्रेष्ठींनी पक्षाचे तालुका अध्यक्ष केले. अध्यक्षपदाची त्यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली. या काळात झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी सर्व गणगटात जावून प्रचारात केलेली भाषणे, पक्षातील बंडखोर गद्दारांसह, विरोधकांवरही केलेली सडेतोड टीका त्यावेळी उमेदवारांना विजयी होण्यासाठी बळ देवून गेली. त्यामुळे मुळशी पंचायत समितीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली होती. त्यांनी बाबूराव रायरीकर प्रतिष्ठानची स्थापना करून रायरीकरांचे उपेक्षित कार्य जनतेसमोर आणले. पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारिणीचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. घरात सुमारे दीड हजार पुस्तकांचे स्वतंत्र ग्रंथालय असलेल्या चांदेरे यांना वाचनाचा मोठा व्यासंग आहे. वाचनातून त्यांना लेखनाचीही आवड निर्माण झाली. राजकारणात आतापर्यंत निष्कलंकपणे काम केलेले चांदेरे यांनी जिल्हा बॅंकेची निवडणूकही अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत जिंकली. त्यामुळेच निवडून आल्याक्षणी उपाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top