Tue, March 28, 2023

केतकेश्वर मंदिरामध्ये लघुरुद्र अभिषेक
केतकेश्वर मंदिरामध्ये लघुरुद्र अभिषेक
Published on : 1 March 2022, 1:32 am
निमगाव केतकी, ता.१ः येथील (ता.इंदापूर) ग्रामदैवत असलेल्या केतकेश्वर महाराज (महादेव) मंदिराच्या प्रांगणात महाशिवरात्रीनिमित्त समस्त ग्रामस्त व कचरनाथ बाबा सेवा मंडळाच्या वतीने १०८ लिंगाचा लघुरुद्र अभिषेक घालण्यात आला. मंदिराच्या प्रांगणात भव्यमंडप घालण्यात आला होता. मंदिरासह परिसरात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई केली होती. तसेच पूजेसाठी १०८ जोड्या बसवण्यात आल्या होत्या. पूजेसाठी विविध भागातील अकरा पुजारी बोलवण्यात आले होते. दर्शनासाठी केतकेश्वरमहाराजांच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती.
01025