सातकरस्थळला पर्यावरण रक्षणासाठी जागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातकरस्थळला पर्यावरण रक्षणासाठी जागृती
सातकरस्थळला पर्यावरण रक्षणासाठी जागृती

सातकरस्थळला पर्यावरण रक्षणासाठी जागृती

sakal_logo
By

कडूस, ता.८ : सातकरस्थळ (ता.खेड) येथे ''माझी वसुंधरा'' अभियानांतर्गत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढीत पर्यावरण रक्षणाच्या घोषणा देत जनजागृती केली. यावेळी निबंध, चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेण्या आल्या.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी राज्यशासनाने गावोगावी राबविलेल्या अभियानात सातकरस्थळ ग्रामपंचायतीने सहभाग नोंदवला आहे. मुलांना शालेय जीवनातच पर्यावरण संवर्धन व संरक्षणाची गोडी लागावी यासाठी ग्रामपंचायतीने गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पर्यावरण संरक्षणाबाबत निबंध, चित्रकला व रांगोळी स्पर्धेचा उपक्रम राबविला. यात प्लॅस्टिक बंदी काळाची गरज, झाडे लावा - झाडे जगवा, जल संधारणाचे महत्त्व, सौर ऊर्जेचे महत्त्व, स्वच्छ परिसर या विषयावर विद्यार्थ्यांची स्पर्धा घेण्यात आली.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून अभियानाची गावात जनजागृती केली. विस्तार अधिकारी सोमनाथ कारंडे, ग्रामविकास अधिकारी राजाराम रणपिसे यांनी पर्यावरण रक्षणाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच संजीवनी थिगळे, उपसरपंच कालिदास सातकर, माजी सरपंच अजय चव्हाण, साहेबराव सातकर, स्वप्नील सातकर, अलका थिगळे, भाग्यश्री राळे, वैशाली मारणे, वैशाली बांगर, धनश्री सांडभोर व ग्रामस्थ उपस्थित होते. शिक्षक नंदा जंगले, नीलिमा गोपाळे, पद्मा शिंदे यांनी परिश्रम घेतले.

......................
00709

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top