चांडोलीतील शिबिराचा १४७० रुग्णांना लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांडोलीतील शिबिराचा १४७० रुग्णांना लाभ
चांडोलीतील शिबिराचा १४७० रुग्णांना लाभ

चांडोलीतील शिबिराचा १४७० रुग्णांना लाभ

sakal_logo
By

कडूस, ता.३० : चांडोली (ता.खेड) येथील ग्रामीण रुग्णालयात पार पडलेल्या सर्वरोग निदान, उपचार, शस्रक्रिया व दंत चिकित्सा शिबिराचा खेड तालुक्याच्या ग्रामीण व आदिवासी भागातील एकूण १४७० रुग्णांनी लाभ घेतल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भगवान काकणे यांनी दिली.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चांडोली-राजगुरुनगर येथील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरमध्ये रविवार (ता.२०) ते बुधवार (ता.२३) या चार दिवसांच्या कालावधीत सर्वरोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये मोतीबिंदू व डोळ्यांच्या विकाराचे निदान व शस्त्रक्रिया, हर्निया, हायड्रोसील, अपेंडिक्स व शरीरावरील गाठींचे निदान व शस्त्रक्रिया, अस्थी रुग्णांची तपासणी व उपचार, नाक-कान-घशाच्या आजाराचे निदान व उपचार, दंतविकार व मुखरोग, बालरोग व स्त्रीरुग्णांच्या आजाराचे निदान तसेच मधुमेह, रक्तदाब, मानसिक रोग्यांच्या आजाराचे निदान व उपचार करण्यात आले. दोष आढळलेल्या रुग्णांवर मोफत उपचारासह शस्त्रक्रिया करण्यात आल्या. वैद्यकीय अधीक्षक डॉ. भगवान काकणे यांच्यासह डॉ.सुनील कोकाटे, डॉ.केदार जगताप, डॉ.राजश्री गवळी, डॉ.मयुरी मालविया, डॉ.सारिका खाडे, डॉ.प्रवीण इंगळे, डॉ.राहुल तायडे, डॉ.अमोल पारधे, डॉ.मनोज गावडे, डॉ.वाघमारे आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले. शिबिराच्या यशस्वितेसाठी ग्रामीण रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ अल्ताफ पठाण, अर्चना धोंडवळे, संध्या हजारे, दिलीप करवंदे, गोविंद शेळकंदे, योगेश बोराळकर, मनाली नाईक, अप्पा खंडागळे, छाया काटकर, शीतल कोहिनकर, वनिता गभाले, माधवी टाकळकर, तान्हुबाई लटपटे व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..