
वडज, धामणखेल येथे माघ पौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी
आपटाळे, ता. १७ : माघ पौर्णिमेच्या औचित्याने हजारो भाविकांनी जुन्नर तालुक्यातील वडज व धामणखेल येथील खंडेरायाचे दर्शन घेतले. यानिमित्ताने आयोजित यात्रा सोहळा उत्साहात संपन्न झाला. दरवर्षी जुन्नर व आंबेगाव यासह अन्य तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. वडज (ता. जुन्नर) येथे कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्टच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेनिमित्ताने गुरुवारी (ता. १७) सकाळी आठ वाजता बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रा उत्सवाचे नियोजन देवस्थानचे अध्यक्ष विजय चव्हाण, कुलस्वामी पतसंस्थेचे उपाध्यक्ष संतोष चव्हाण, संचालक सुनील चव्हाण, सरपंच सुनील चव्हाण, उपसरपंच नंदा चव्हाण, सदस्य अमोल चव्हाण, सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, मल्हारी चव्हाण, तंटामुक्तीचे अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, उपाध्यक्ष संतोष चव्हाण आदींनी केले.
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..