
''आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली''
घोडेगाव, ता. २८ : आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली, असे मत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांनी काढले. आदिवासी शासकीय मुलींचे वसतिगृह शिनोली (ता आंबेगाव) येथील मार्च २०२२ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेला जाताना करावयाची तयारी व इयत्ता १२ वीच्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून गायकवाड बोलत होते.
यावेळी गायकवाड म्हणाले, की आदिवासी विकास विभागातील विद्यार्थी यांनी आश्रमशाळा व वसतिगृहात शिक्षण घेत असताना वेळेचा सदुपयोग करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करून अवांतर वाचन करून १२ वी मध्येच आपले धेय्य निश्चित जीवनाचा मार्ग निवडला पाहिजे. तरच आपण यशाच्या शिखरावर निश्चित पोहूचू .
यावेळी वसतिगृहातील विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.
निरोपसमारंभप्रसंगी विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सहा प्रकल्प अधिकारी योगेश खंदारे व व्ही. टी. भुजबळ, मुख्याध्यापक अविनाश ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. प्रा. जयसिंग गाडेकर यांनी विद्यार्थिनींना परीक्षेला जाताना करावयाची तयारी या बाबत मार्गदर्शन केले.
गौतम खरात यांनी सूत्रसंचालन केले. गृहपाल गौतम खरात यांनी प्रास्ताविक केले.
,.................,...........................
01356