साहित्यदीप वाचन चळवळीतर्फे पुस्तके प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साहित्यदीप वाचन चळवळीतर्फे पुस्तके प्रदान
साहित्यदीप वाचन चळवळीतर्फे पुस्तके प्रदान

साहित्यदीप वाचन चळवळीतर्फे पुस्तके प्रदान

sakal_logo
By

घोडेगाव, ता. २ : साहित्यदीप वाचन चळवळ यांच्या वतीने पोखरकरवाडी (ता. आंबेगाव) येथे सुरू होत असलेले महेश ज्ञानेश्वर पोखरकर स्मरणार्थ वाचनालयास ५० पुस्तके प्रदान करण्यात आली. साहित्यदीप वाचन चळवळीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. प्रा. सागर पारधी यांच्या हस्ते ही पुस्तके ग्रंथालयाचे व्यवस्थापक यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.
दरम्यान, चळवळीच्या वतीने आपटी, घोडेवाडी (बोरघर), फुलवडे, थुगाव, न्हावेड, अवसरी खुर्द येथे याअगोदरच ग्रंथालये सुरू करण्यात आली आहेत. साहित्यदीप वाचन चळवळीचे पदाधिकारी जीएसटी उपायुक्त महेश जगताप, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वायाळ, उद्योजक विजय केंगले आणि डॉ. अमोल वाघमारे यांनी यापुढे ही ''गाव तेथे ग्रंथालय'' ही मोहीम सुरू ठेवण्याचा निर्धार केलेला आहे.
यावेळी पोखरकरवाडी येथील ग्रामस्थ रामदास पोखरकर, भिका पोखरकर, नीलेश पोखरकर, गणेश पोखरकर, महेश गुंजाळ, प्रशांत पोखरकर, किशोर गुंजाळ, आदीम संस्थेचे नंदन लोंढे, दिव्या जाधव, भारती बाळापुरे उपस्थित होते.

01358