नानगावात मसाला कंपनीला आग

नानगावात मसाला कंपनीला आग

Published on

केडगाव, ता. २२ : नानगाव (ता. दौंड) येथील प्रतीक मसाले कंपनीच्या गोदामाला सोमवारी (ता. २२) सकाळी साडेनऊ वाजता शॅार्टसर्किटमुळे आग लागून सुमारे ८७ लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नानगावमध्ये शेतकरी कुटुंबातील रवींद्र रामदास खळदकर यांची प्रतीक मसाले प्रॅाडक्ट नावाची कंपनी आहे. कंपनीच्यावतीने मसाले, मसालावर्गीय पदार्ध व लोणचे बनविले जाते. त्यांच्या गोदामाला सोमवारी सकाळी आग लागली. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन पथक येईपर्यंत ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. त्यामुळे मोठे नुकसान झाले. पथक आल्यानंतर आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत अडीच टन मिरचीसह आमसूल पावडर ३५०, लसूण पावडर ७६६ किलो, कढीपत्ता पावडर २०० किलो, धना पावडर १२०० किलो, पापड ६५० किलो, ओवा ८९९ किलो, मिरी ३०० किलो, चिंच २४० किलो, हळकुंड ५०० किलो, मनुके १६५ किलो आदी ३२ प्रकारचे मसाले पदार्थ जळून खाक झाले.
घटनास्थळाचा महसूल व पोलिसांनी पंचनामा केला असून, सुमारे ८७ लाख रुपयांचा नुकसानीचा अंदाज व्यक्त केला आहे. ही आग शॅार्टसर्किटमुळे लागल्याचे वीज कंपनीकडून सांगण्यात आले आहे. याबाबतचा पुढील तपास यवत पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com