Sat, April 1, 2023

विज्ञान प्रदर्शनात ५९२ प्रकल्प सादर
लक्ष्मी नृसिंहचरणी मुजावरांचे कायदा सुव्यस्थेसाठी साकडे
Published on : 2 March 2022, 8:41 am
नीरा नरसिंहपूर, ता. २ : नीरा नरसिंहपूर (ता इंदापूर) येथे कायदा व सुव्यवस्था तसेच भाईचारा अबाधित राहण्यासाठी लक्ष्मी नृसिंहचरणी इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक तय्युब मुजावर यांनी साकडे घातले.
यावेळी बावडा दुरक्षेत्रचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, सहायक पोलिस निरीक्षक धनवटे, पोलिस उपनिरीक्षक धोतरे, पोलिस नाईक गायकवाड, पोलिस नाईक कळसाईत, पोलिस कॉन्स्टेबल राखुंडे आदि उपस्थित राहून श्री लक्ष्मी नरसिंह देवाचे दर्शन घेतले. तसेच मंदिर परिसराची पाहणी केली.
यावेळी नीरा नरसिंहपूरचे सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत सरवदे, उपसरपंच सुनील मोहिते, आनंद काकडे, विजय सरवदे, नरहरी काळे, नानासाहेब देशमुख, नितीन सरवदे, विठ्ठल देशमुख, दत्तात्रेय कोळी महाराज, दशरथ राऊत, राजेंद्र बळवंतराव, सोनू केसकर, वैभव घाडगे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
02249