भीमा नदीवरील बंधारे तुडूंब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भीमा नदीवरील बंधारे तुडूंब
शिरूरमधील आणखी २४ शाळा ‘निरंक’-KND21B0118

भीमा नदीवरील बंधारे तुडूंब

sakal_logo
By

नीरा नरसिंहपूर, ता.१९ ः उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी भीमा नदीत सहा हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून, २५ एप्रिलपर्यंत हे पाणी सुरू राहील, अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली. दरम्यान, या पाण्यामुळे भीमा नदीवर असलेले कोल्हापूर पध्दतीचे १७ बंधारे पाण्यामुळे भरणार आहेत.
उजनी धरणात ५३ टक्के पाणी साठा आहे. उन्हाळ्यात शेती, पिण्यासाठी व इतर सर्व उद्योगासाठी पाणी कमी पडणार नाही असे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. सोलापूर शहराला टाकळी बंधाऱ्यातून पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या नवीन दोन मोठे पंप बसवण्यात आले आहेत. त्यामुळे टाकळी बंधाऱ्यातील पाणी २६ किंवा २७ एप्रिलपर्यंत पुरेल अशी वस्तुस्थिती आहे. सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी २५ एप्रिलपर्यंत टाकळी बंधाऱ्यात पाणी पोहोचले पाहिजे, असे पत्राद्वारे जलसंपदा विभागाला कळवले आहे.
सदरच्या नियोजनानुसार उजनी धरणातून वीजनिर्मिती केंद्रासाठी १६०० क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये ५ हजार ६०० क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रात ६ हजार क्युसेकचा विसर्ग झाला आहे. सदरचे पाणी आठ ते नऊ दिवस नदी प्रवाहित राहणार आहे. सदरचे पाणी २३ किंवा २४ एप्रिलपर्यंत टाकळी बंधाऱ्यात पोहोचेल व २५ एप्रिलपर्यंत टाकळी व चिंचपूर बंधारे पूर्ण क्षमतेने भरून पुरेसा पाणीसाठा होईल.
दरम्यान, या पाण्यामुळे पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आदी शहरांना व भीमा नदीकाठावरील माढा व इंदापूर तालुक्यातील गावे व वाड्या वस्त्यांवरील नागरिक व पशुधनाला पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. त्याचप्रमाणे भीमा नदीवर असलेले कोल्हापूर पध्दतीचे १७ बंधारे पाण्यामुळे भरणार आहेत. सध्या उजनी धरणातून कालवा, बोगदा, सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. धरणात सध्या एकूण पाणीसाठा ९२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.
NPR22B02356

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..