वसंतराव नाईक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डोके, उपाध्यक्षपदी चौगुले यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसंतराव नाईक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डोके, उपाध्यक्षपदी  चौगुले यांची  निवड
वसंतराव नाईक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डोके, उपाध्यक्षपदी चौगुले यांची निवड

वसंतराव नाईक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डोके, उपाध्यक्षपदी चौगुले यांची निवड

sakal_logo
By

वसंतराव नाईक पतसंस्थेच्या
अध्यक्षपदी नेताजी डोके
नारायणगाव, ता. १ : जुन्नर तालुक्यात अग्रेसर असलेल्या वसंतराव नाईक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नेताजी डोके यांची; तर उपाध्यक्षपदी राजू चौगुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ई. डी. माळवे यांनी दिली.
या पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली होती. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी माळवे यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची बैठक पतसंस्थेच्या कार्यालयात झाली. या वेळी ज्येष्ठ संचालक बाबूराव देवकर, निवृत्ती भोसले, विठ्ठल वायकर, राजेंद्र पायमोडे, दिनकर राहिंज, किशोर होनराव, टी. आर. वामन, बी. एम. शिंदे, बबनराव बोराटे, महेंद्र लाड, मंगल वऱ्हाडी, कुसुम चासकर, नितीन वाळुंज, अजित सहाणे, दत्ता गाडेकर, गोरक्ष गुंजाळ आदी उपस्थित होते. ज्येष्ठ संचालक बाबूराव देवकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष डोके व उपाध्यक्ष चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.
डोके म्हणाले, ‘‘संचालक मंडळाला विश्वासात घेऊन संस्थेच्या प्रगतीसाठी व सभासदांच्या हितासाठी काम केले जाईल.’’

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top