सणसवाडी ग्रामपंचायतीत उद्या कंपन्यांसोबत बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सणसवाडी ग्रामपंचायतीत
उद्या कंपन्यांसोबत बैठक
सणसवाडी ग्रामपंचायतीत उद्या कंपन्यांसोबत बैठक

सणसवाडी ग्रामपंचायतीत उद्या कंपन्यांसोबत बैठक

sakal_logo
By

सणसवाडी, ता. १० : औद्योगिक क्षेत्रात स्थानिकांना नोकऱ्या व स्थानिक कंपन्यांच्या सर्व समस्यांचे जाहीर निराकरण व कंपन्यांच्या स्थानिकांबद्दलच्या तक्रारींबाबत खुली चर्चा सणसवाडी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी (ता. १२) होणार असून, यासाठी सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधींसह पोलिस, महसूल, प्रदूषण नियंत्रण मंडळ व औद्योगिक सुरक्षा विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती सरपंच सुनीता दरेकर व उपसरपंच सागर दरेकर यांनी दिली.
स्थानिकांना औद्योगिक क्षेत्रात रोजगार, स्वयंरोजगार आदींसाठी डावलले जात असल्याच्या तक्रारीवरून सणसवाडी ग्रामपंचायतीने २२ नोव्हेंबर रोजी एकमुखाने ठराव घेऊन हद्दीतील सुमारे सव्वाशे कंपन्यांना आपल्या सर्व तक्रारींसह एकत्र बैठकीचे निमंत्रण दिले होते. याला सर्वांनी प्रतिसाद देताना ग्रामपंचायतीकडून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, शिक्रापूर पोलिस, तहसीलदार, कामगार आयुक्त कार्यालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ व औद्योगिक सुरक्षा विभाग यांनाही पत्रव्यवहार केला होता. या सर्व शासकीय विभागांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर बुधवारी सकाळी ११ वाजता सणसवाडी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित केली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top