clean survey campaign
clean survey campaignsakal

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ साठी लोणावळा सज्ज

सलग चार वर्षे लोणावळा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशपातळीवर यश मिळविले आहे.
Published on

लोणावळा : स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान २०२२ साठी लोणावळा पुन्हा एकदा सज्ज झाला असून, या अभियानाची जोरदार तयारी सुरू आहे. स्वच्छता अभियानासह स्वच्छ सर्वेक्षण अभियान व माझी वसुंधरा अभियानाची लोकचळवळ गतिमान झाली असून, स्वच्छ सर्वेक्षण अभियानमध्ये प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी पुन्हा लोणावळा नगरपरिषद प्रयत्नशील असल्याचा मानस नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी व्यक्त करत मोहिमेचा प्रारंभ केला. सलग चार वर्षे लोणावळा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशपातळीवर यश मिळविले आहे. (Lonavala Municipal Council is again trying to win the first place in the clean survey campaign)

clean survey campaign
भारतात 'बूस्टर डोस' कधी आणि कुणाला मिळणार?

नगरपरिषदेने यावर्षी देशात दुसरा क्रमांक पटकावीत नावलौकिक मिळवला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नगरपरिषदेचा गौरव झाला. स्वच्छता प्रेमी व्यक्ती, संस्था, औद्योगिक कंपन्या, शासकीय यंत्रणा, शालेय विद्यार्थी, महिला, नागरिकांसह नगरपरिषदेचे कर्मचारी अशा सर्वांचे स्वच्छतेतील योगदान मिळत असून यंदा प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्षा सुरेखा जाधव व मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी दिली. प्रसिद्ध सिनेअभिनेत्री आयेशा झुल्का यांना लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे ब्रँड करण्यात आले आहे.लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण-२०२२ अंतर्गत जिंगल्स स्पर्धा, शॉर्ट मूव्हीज स्पर्धा, निबंध, वॉल पेंटिंग, पोस्टर्स, चित्रकला, पथनाट्य, उत्कृष्ट किचन गार्डन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून, विजेत्यांना रोख बक्षिस देण्यात येणार आहे.

clean survey campaign
नागपूर : आत्महत्येचा विचार...अन् पोलिसांचा विळखा

नगरपरिषदेच्या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होत स्वच्छता अभियान मोहिमेला सहकार्य करावे. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी असल्याने प्रत्येकाने स्वच्छाग्रही व्हा आणि आपले घर, परिसर, गाव व शहर स्वच्छ ठेवा असे आवाहन लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले.प्लॉग-ओ-थॉन रन व सायकलची गुरुवारी रॅलीलोणावळा नगरपरिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण-२०२२ अंतर्गत गुरुवारी (ता. ३०) जनजागृती मोहिमेअंतर्गत ‘प्लॉग-ओ-थॉन रन’ व ‘सायकल रॅलीचे’ आयोजन करण्यात आले आहे. सिने अभिनेता सिद्धार्थ जाधव व अभिनेत्री आयेशा झुल्का हे यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती असल्याची माहिती नगराध्यक्षा सुरेखा जाधव व मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी दिली. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता प्लॉग-ओ-थॉन रण तर साडेदहा वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.(Plog-O-Thon Run and Cycle Rally)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com