नागपूर : आत्महत्येचा विचार...अन् पोलिसांचा विळखा

प्रेमविवाह केल्यानंतर संसार करताना कौटुंबिक संकटाला कंटाळून हिंगणघाटच्या एका युवकाने पत्नीच्या मोबाईलवर स्वतःची सुसाईड नोट पाठविली
nagpur police
nagpur policesakal

नागपूर : प्रेमविवाह केल्यानंतर संसार करताना कौटुंबिक संकटाला कंटाळून हिंगणघाटच्या एका युवकाने पत्नीच्या मोबाईलवर स्वतःची सुसाईड नोट पाठविली आणि घरातून निघून गेला. त्याने थेट नागपूर रेल्वेस्थानक गाठले. रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या विचारात असतानाच गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला विळखा घातला. ताब्यात घेऊन त्याचे समूपदेशन करीत त्याचा जीव वाचवला. (youth sent his own suicide note on his wife's mobile)

nagpur police
'मोदींनी माझं ऐकलं', बूस्टर डोसच्या घोषणेनंतर महुआ मोइत्रा यांची प्रतिक्रिया

विलास (३२) हा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमधील रहिवाशी असून तो लॅब असिस्टंट म्हणून काम करतो. लॅबमध्ये सहायक असलेल्या तरूणीचे त्याचे सूत जुळले. दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर २०१७ मध्ये दोघांनी कुटुंबियांच्या सहमतीने प्रेमविवाह केला. त्यांच्या संसारवेलीवर गोंडस फुल उमलले. दोघांचा संसार सुरळित सुरू असताना विलासच्या आई आणि पत्नीमध्ये नेहमी कुरबूर व्हायला लागली. तो वेळोवेळी दोघींचीही समजूत घालायचा आणि पुन्हा आपला संसार रूळावर आणायचा.परंतु, वारंवार सासू-सुनेत होणारा वाद आणि त्यानंतर घरात होत असलेली घुसमट त्याला सहन होत नव्हती. त्यामुळे तो गेल्या काही दिवसांपूर्वीच वेगळा संसार थाटला. परंतु, आईवडिलांवर असलेले प्रेम आणि पत्नी-मुलगा यांच्यात दुरावा निर्माण झाल्याने तो अस्वस्थ होता. त्यामुळे त्याला जगण्याची इच्छा नव्हती. त्याने गेल्या आठ दिवसांपूर्वी पत्नी व मुलाला माहेरी सोडले. घरात एकटा राहताना त्याने आयुष्याचे गणित मांडून आत्महत्येचा विचार केला. (Living alone at home, he thought of committing suicide)

nagpur police
भारतात 'बूस्टर डोस' कधी आणि कुणाला मिळणार?

त्याने सुसाईड नोट लिहिली आणि पत्नीच्या मोबाईलवर पाठविली आणि घरातून निघून गेला. पत्नीने लगेच नातेवाईक आणि सासू-सासऱ्यांना माहिती दिली. नातेवाईकांनी शोधाशोध आणि धावपळ केली. मात्र, हाती काहीही लागले नाही.

मुलाचा गोंडस चेहरा दिसायचा

विलास याने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या करण्याचे ठरविले. तो शुक्रवारी सायंकाळी नागपुरात आला. त्याने रेल्वेस्थानकावर झोपून रात्र काढली. सकाळी उठला आणि आत्महत्या करण्याची तयारी केली. परंतु, त्याचे धाडस होत नव्हते. त्याच्या डोळ्यासमोर मुलाचा चेहरा वारंवार दिसत होता. त्याचे भविष्य दिसत होते. त्यामुळे तो अस्वस्थ झाला आणि सीताबर्डीत पोहचला.

nagpur police
पुणे : बनावट अधिकारपत्राद्वारे वाघोलीतील १० एकर जागा बळकावण्याचा प्रयत्न

गुन्हे शाखेची सतर्कता

विलासचा मेव्हणा गुन्हे शाखेच्या एएचटीयू पथकाच्या पीआय मंदा मनगटे आणि सहायक निरीक्षक रेखा संकपाळ यांच्याकडे आला. त्यांनी लगेच हवालदार ज्ञानेश्‍वर ढोके यांच्या पथकाला रवाना केला. पीएसआय बलराम झाडोकार हे रेखा संकपाळ यांना तांत्रिक माहिती पुरवित होते. शेवटी दुपारी कोणताही सुगावा नसताना विलासला ताब्यात घेण्यात आल्याने त्याचा जीव वाचला.प्रिय बायको...मुलाला मोठे कर आणि चांगले संस्कार दे...मुलाचे भविष्य पाहता मला आत्महत्या करण्याची इच्छा नाही. परंतु, माझा नाईलाज आहे...असे आयुष्य मी नाही जगू शकत...मी मेल्यावर माझ्या मृतदेहाला माझ्या मुलाच्याच हाताने मुखाग्नी दे...त्यामुळे माझ्या आत्म्याला शांती मिळेल. ‘बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो...मला माफ कर.’ अशी सुसाईड नोट विलासने लिहून आत्महत्या करण्यासाठी घर सोडले.(Baby, I love you so much ... I'm sorry.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com