कोयाळी येथील हातभट्टीवर छापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोयाळी येथील हातभट्टीवर छापा
कोयाळी येथील हातभट्टीवर छापा

कोयाळी येथील हातभट्टीवर छापा

sakal_logo
By

आळंदी, ता. १५ : कोयाळी (ता. खेड) येथे नदीकाठी सुरू असलेल्या गावठी दारुच्या हातभट्टीवर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीनने छापा मारुन कारवाई केली. त्यात तब्बल अडीच लाखांचे दारू तयार करण्याचे साहित्य पोलिसांनी नष्ट केले.
याप्रकरणी कपिल गब्बर रजपूत (रा. कोयाळी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस शिपाई सागर जैनिक यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कोयाळी येथे खुलेआम दारू तयार करत आहे. त्याचे दारुसाठीचे कच्चे रसायन पोलिसांनी नष्ट केले. दरम्यान कोयाळी भागात सर्वात मोठ्या प्रमाणात दारू तयार केली जात होती. आळंदी पोलिसांच्या हद्दीत अशाप्रकारे खुलेआम अनेक ठिकाणी दारू तयार करून बेकायदा विक्री केली जात आहे. कोयाळी, मरकळ गावातील अनेक हॉटेलमध्ये बेकायदा सर्रास दारू विक्री चालते.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top