आगामी शैक्षणिक धोरण संस्थांना अडचणीत आणणारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आगामी शैक्षणिक धोरण संस्थांना अडचणीत आणणारे
आगामी शैक्षणिक धोरण संस्थांना अडचणीत आणणारे

आगामी शैक्षणिक धोरण संस्थांना अडचणीत आणणारे

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. २ : शिक्षण संस्था व विनाअनुदानित शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा चालू असून, समस्या असल्यातरी शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता अद्याप टिकून आहे. आगामी काळात येऊ घातलेले शैक्षणिक धोरण शिक्षण संस्थांना अडचणीत आणणारे आहे, असे मत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभागृहात ते बोलत होते. यावेळी शिक्षण संस्थाचालक व काँग्रेस कार्यकर्त्यांना पटोले यांनी मार्गदर्शन केले.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पटोले म्हणाले, ‘‘देश व घटना वाचविण्यासाठी काँग्रेसशिवाय देशात दुसरा पर्याय नाही. स्वातंत्र्य व संविधान अबाधित राखणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत देशात सत्ता परिवर्तन निश्चित होणार आहे. जे पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेस सोडून इतर पक्षात गेले आहेत त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये पूर्वीच्या राजकीय घरात यावे असे आवाहन करून, कार्यकर्त्यांना वरिष्ठ पातळीवरून राजकीय बळ दिले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाने ग्रामीण भागात केलेले कार्य व पुणे जिल्हा काँग्रेसचे खजिनदार महेशबापू ढमढेरे यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे विशेष कौतुक पटोले यांनी केले.
नवीन शैक्षणिक धोरण, महाविकासआघाडीची वाटचाल, वाढती महागाई, इंधनवाढ, केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी धोरण, काँग्रेस पक्षाची पुढील वाटचाल आदी मुद्द्यांवर कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.
दरम्यान, यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, मानद सचिव अरविंद ढमढेरे यांनी मनोगत व्यक्त करून, पटोले यांच्याकडे निवेदन सादर केले.
यावेळी माजीमंत्री चंद्रकांत हांडोरे, ज्येष्ठ नेते देविदास भन्साळी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव, तालुका काँग्रेसच्या महिला अध्यक्षा प्रियांका बंडगर, नगरसेविका संगीता मल्लाव, नवनाथ कांबळे, अशोक भुजबळ, रामदास थोरात, शिक्षण संस्थेचे संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते व शिक्षक आदी उपस्थित होते.

2725

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top