रब्बीसाठी डिंभेतून १८० क्‍सूसेकने पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रब्बीसाठी डिंभेतून १८० क्‍सूसेकने पाणी
रब्बीसाठी डिंभेतून १८० क्‍सूसेकने पाणी

रब्बीसाठी डिंभेतून १८० क्‍सूसेकने पाणी

sakal_logo
By

रांजणगाव गणपती, ता. ८ : शिरूर तालुक्यातून जाणारा डिंभा उजव्या कालव्याला डिंभे धरणातून १८० क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे. रब्बी हंगामातील हे आवर्तन शेवटच्या टोकाला पोहचले असून, या पाण्याचा उपयोग योग्य पद्धतीने करावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी केले आहे.
डिंभा उजव्या कालव्याचे रब्बी हंगामातील आवर्तन शेवटच्या टोकाला जाऊन पुन्हा शिरूर तालुक्यातील कर्डीलवाडी येथे पर्यंत दिले जात आहे. शिरूर तालुक्यातून जाणारा डिंभा उजव्या कालव्याचे काही ठिकाणी नव्याने अस्तरीकरण केल्याने टेल टू हेड पाणी देण्यास सोईस्कर झाले आहे.
रब्बी हंगामासाठी सोडलेल्या हे आवर्तन टेलला पोहचून पुन्हा परतीच्या मार्गावर आहे. गहू, ज्वारी, हरभरा, मका, कांदा, फळबागा, ऊस या पिकासाठी हे पाणी दिले जात आहे. त्याचा अपव्यय होणार नाही. याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. नमुना सात नंबर पाणी अर्ज भरून द्यावे. पाण्याचा वापर होत असल्याने पाणी पट्टी भरून सहकार्य करावे.
असे शाखा अभियंता दत्तात्रेय कोकणे यांनी आवाहन केले आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाने किलोमीटर ७२ ते १०८ पर्यंत कालव्याचे अस्तरीकरण झाले आहे. त्यामुळे शेवटच्या टोकाला पाणी नेण्यास मदत झाली आहे. भविष्यात शेतीला पाणी मिळण्यासाठी अस्तरीकरणाच्या कामाची काळजी घ्यावी, असे आवाहन आंबेगाव - शिरूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी केले आहे.

02701

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top