
विद्यार्थ्यांनी रेखाटल्या वैज्ञानिक रांगोळ्या
तळेगाव ढमढेरे, ता. २६ : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान दिनानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वैज्ञानिक रांगोळ्या रेखाटल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सूर्यकांत पालांडे होते. सुबक व आकर्षक रांगोळी पाहून पलांडे यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले. यावेळी पलांडे म्हणाले,‘‘विद्यार्थ्यांनी उच्च गुणवत्ता प्राप्त करून आपल्या जीवनाचा मार्ग शोधावा व आपले जीवन यशस्वी करावे. तसेच, तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे,’’ असे मत पलांडे यांनी व्यक्त केले. तसेच, शिक्षक व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेच्या मूलभूत सुविधांसाठी विद्यालयाला आर्थिक मदत केली. या मदतीचा स्वीकार प्राचार्य रमेश वाळके यांनी पलांडे यांच्या हस्ते केला. प्राचार्य रमेश वाळके यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संजीव मांढरे यांनी सूत्रसंचालन केले. मुकुंद ढोकले यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..