Thur, March 23, 2023

झोपडीला आग लागून ओतूरला संसार खाक
झोपडीला आग लागून ओतूरला संसार खाक
Published on : 1 March 2022, 2:08 am
ओतूर, ता.१ : येथील (ता.जुन्नर) ओतूर मुंजाबा रोडवर आवळी परिसरात झोपडी वजा घराला आग लागली. यामुळे सर्व संसार उपयोगी वस्तूंसह जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र, सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
शेतकरी अवधूत जालिंदर गाढवे यांच्या आवळी परिसरातील शेतात ओतूर मुंजाबा मार्गाच्या कडेला त्यांचे शेतमजूर दादाभाऊ केदारी हे गवत बांबूपासून बनवलेल्या पत्राशेडवजा झोपडीमध्ये राहत होते. सोमवारी (ता.२८) मध्यरात्री अचानक त्यांच्या घराला आग लागली. आजून बाजूला पाण्याचे काही सोय नसल्यामुळे त्यांना आग विझवता आली नाही. त्याच्यासमोर सर्व संसार उपयोगी वस्तूंसह भांडी, कपडे, धान्य व पाच कोंबड्याही जळून खाक झाल्या. अंदाजे वीस हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. याबाबत ओतूर पोलिसात अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
02369