
श्री मुक्ताई भैरवनाथ पॅनेलचे बेल्हे सोसायटीवर वर्चस्व कायम
बेल्हे, ता. १ : बेल्हे (ता. जुन्नर) येथील बेल्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण १७ जागांपैकी श्री मुक्ताई भैरवनाथ पॅनेलने १० जागांवर, तर मुक्ताईमाता शेतकरी परिवर्तन पॅनेलने ७ जागांवर विजय संपादन केला. त्यामुळे श्री मुक्ताई भैरवनाथ पॅनेलने सोसायटीवर वर्चस्व राखण्यात यश मिळवले आहे.
सोसायटीच्या निवडणुकीत एकूण ३ हजार १४ पैकी १ हजार ८९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकारी अनिता येंधे यांनी जबाबदारी सांभाळली. श्री मुक्ताई भैरवनाथ पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- वसंत दावला कदम, अशोक जनार्दन गुंजाळ, काशिनाथ मारुती गुंजाळ, लहु भीमाजी गुंजाळ, जयवंत बाळासाहेब घोडके, जानकु मुक्ता डावखर, बन्सी बबन डावखर, रामभाऊ कृष्णाजी बोरचटे, निवृत्ती भाऊ वाकचौरे, धोंडिभाऊ सदाशिव पिंगट. मुक्ताईमाता शेतकरी परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- कैलास नाथा औटी, मोहन बाळशिराम बांगर, संदीप रभाजी बोरचटे, अतुल भाऊसाहेब भांबेरे, शांताबाई बबन डावखर, सुजाता रामदास वाघ, किशोर धोंडिभाऊ तांबे.