
धानोरे सोसायटीच्या अध्यक्षपदी थेऊरकर
तळेगाव ढमढेरे, ता. २१ : धानोरे (ता. शिरूर) विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर बबन थेऊरकर आणि उपाध्यक्षपदी मोहन बबन कामठे यांची बिनविरोध निवड झाली.
धानोरे संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री घनोबा शेतकरी विकास सहकार पॅनेलने ९ जागांवर यश मिळवून सत्ता प्रस्थापित केली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी ज्ञानेश्वर थेऊरकर व उपाध्यक्षपदासाठी मोहन कामठे यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शंकर कुंभार व सचिव रूपेश शीलवंत यांनी जाहीर केले.
यावेळी तिरसिंग जवळकर, ऋषिकेश ढमढेरे, बापूसाहेब भोसुरे, आशुतोष ढमढेरे, बाबू गायकवाड, चंद्रभागा तनपुरे व शालन दरेकर हे संचालक उपस्थित होते.
निवडीनंतर अध्यक्ष थेऊरकर आणि उपाध्यक्षकामठे यांचा संचालक व ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी रामदास जवळकर, विक्रम दरेकर, अशोकराव भोरडे, रामभाऊ ढमढेरे, रमेश ढमढेरे, चंद्रकांत भोसुरे, सूर्यकांत भोसुरे, गंगाराम कामठे, बाळासाहेब तनपुरे, तुकाराम दरेकर, शिवाजी ढमढेरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष थेऊरकर म्हणाले, ‘‘आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालकांना विश्वासात घेऊन व शेतकरी सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन संस्थेचा कारभार करणार आहे.’’
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..